संस्थेविषयी

अपंग सेवा हीच ईश्वर सेवा या ध्येयाने प्रेरित होवून डॉ. मधुसूदनजी भट्टड व सहकार्यांनी श्रीराम एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन खामगांव शहरात २ ऑक्टोंबर १९८५ रोजी १५ विद्यार्थ्यांना घेऊन कर्णबधिरांच्या शिक्षणाचे रोपटे लावण्यात आले. त्याचे आज भव्य वटवृक्षात रुपांतर झाले. समाजातील ज्या मुलांना मुके बहिरे म्हणून वाळीत टाकले जात होते त्याच मुलांना समाजाच्या प्रवाहात प्रवाहित होण्याकरिता त्यांचे सामाजिक समायोजन व्हावे, बालके स्वावलंबी व्हावित, स्वाभिमानाने जीवन जगावित या उद्देशाने त्यांचे अध्ययन, पुनर्वसन व रोजगार निर्मितीकरिता झटणारी विदर्भातील ही ख्यातनाम सेवाभावी संस्था, मायेची सावली ठरत आहे. 

सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून ४ ते १६ वर्ष वयोगटातील कर्णबधिर बालकांच्या शिक्षण व पुनर्वसनाचे कार्य संस्थेकडून केले जाते विद्यार्थांना भोजन, निवास, गणवेश इत्यादी सुविधा संस्थेकडून विनामुल्य पुरविल्या जातात. कर्णबधिरांच्या शास्त्रोक्त पद्धतीच्या शिक्षणासाठी लागणारी आवश्यक ती यंत्रसामग्री संस्थेने स्वनिधी तसेच देणगीच्या स्वरुपात मिळविली आहे. एकूण १५० कर्णबधिर बालके याचा लाभ घेतात. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागातील (ग्रामीण) बालकांचाही समावेश यात आहे. मान्यतेनुसार ७५ मुलांसाठी मदत शासनाकडून मिळते तथापि त्यापेक्षा अतिरिक्त असलेल्या जादा बालकांचे संगोपन करुन त्यांचा रोजचा नाश्ता, भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, तद अनुषंगीक आवश्यक त्या सर्व बाबी पुरविणे हे अत्यंत खर्चिक काम गेली ३६ वर्ष संस्था करीत आहे.

श्रीराम शिक्षण संस्था ही खामगाव शहरातील दसर्‍याच्या मैदानात स्थित आहे. आमची संस्था २ ऑक्टोबर १९८५ रोजी फक्त पाच विद्यार्थ्यांसह सुरु झाली होती आणि आज आमच्या निवासी मूक बधिर विद्यालयात सुमारे १५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आमच्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट मूक बधिर मुलांचे शिक्षण व पुनर्वसन करणे आहे. आम्ही समाजातील दुर्बल घटकांना सहकार्य करण्यासाठी समर्पित आहोत आणि त्यांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांचे जीवन सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

शाळेत डिजिटल श्रवणयंत्र, ई-लर्निंग सेट, ध्वनिप्रूफ भाषण थेरपी रूम आणि संगणक प्रयोगशाळा यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. आमचे कुशल शिक्षक व कर्मचारी विद्यार्थीच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी अहोरात्र मेहनत घेतात. आम्ही विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच देत नाही तर त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी विशेष क्राफ्ट रूममध्ये विविध हस्तकला प्रशिक्षण देखील देतो. समाजातील उदार व्यक्ती व संस्थांच्या सहकार्यामुळे, आमच्या शाळेतील ७५ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च समर्थपणे पूर्ण होत आहे.

श्रीराम शिक्षण संस्था या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून, आम्ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि त्यांना स्वाभिमानाने व आत्मविश्वासाने उभे राहण्यास सक्षम बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत.

आपण विद्यालयाच्या विविध सेवांमध्ये आर्थिक किंवा वस्तुरूपाने सहाय्य करू शकता. देणगी देण्यासाठी व अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा.

आपण आपल्या वाढदिवस, वर्षगांठ किंवा विशेष दिवस या विद्यार्थ्यांसह साजरे करू शकता.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
डॉ. गोपाल सोनी : ७९७२३६५५४८
श्री ब्रिजगोपाल भटड : ९४२२१८३९९८
श्री प्रकाश जगताप : ९५४५५९९७७७
पत्ता : निवासी मूक बधिर विद्यालय, आमडापुर नाका, तिळक राष्ट्रीय शाळा मागे, खामगांव ४४४३०३ जि. बुलढाणा 

Bank details :- Shriram Education Society Khamgaon, Maharashtra
Name : Bank of Baroda
IFSC : BARBOKHAMGA, MICR Code – 444012302
Account no. : 09690100001539