आवाहन
श्रीराम एज्युकेशन सोसायटीने कर्णबधिरांसाठी शिक्षण व पुनर्वसनाचे कार्य सन १९८५ पासून हाती घेतलेले आहे. हे कार्य सागराप्रमाणे अथांग आहे आणि आमची साधने मर्यादित आहेत. संस्थेपुढे आज बरीच आव्हाने उभी आहेत. संस्थेला ७५ विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून अनुदान मिळते. परंतु अतिरिक्त विद्यार्थ्यांचा सर्व खर्च संस्था दानदात्यांच्या सहकार्यामुळे चालवित आहे. कर्णबधिरांचे शिक्षण व पुनर्वसनाच्या पवित्र कार्यात आपण उदार अंतःकरणाने देणगी तन-मन-धन स्वरुपात देऊन सहकार्य करावे. संस्थेचे बांधकाम व इतर कार्यात सहकार्य करणे, कर्णबधिरांसाठी श्रवणयंत्र, गणवेशासाठी देणगी, दत्तक पालक योजनेतून सहभाग, शैक्षणिक व इतर साहित्य पुरविणे, पुनर्वसन प्रकल्पात सहभाग.
