साऊंड प्रुफ रूम (ध्वनिविरहित खोली)
या कक्षात प्रत्येक कर्णबधिर बालकांची दोन्ही कानाची ऐकण्याची क्षमता याचे मापन प्रशिक्षित श्रवणशास्त्र तज्ञ व वाचा उपचार तज्ञ यांच्याकडून करण्यात येते. त्यानुसार त्यांच्या श्रवण आलेखावरून त्याला योग्य ते श्रवण यंत्र मोफत पुरविण्यासाठी मदत करते व उर्वरित श्रवण शक्तीचा वापर करुन त्याची वाचा दुरुस्ती केली जाते. संस्थेकडे अद्यावत ध्वनी विरहीत श्रवण चाचणी कक्ष उपलब्ध आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या वाचा दुरुस्तीसाठी स्पीच ट्रेनर उपलब्ध आहे. स्पीच ट्रेनर द्वारे विद्यार्थ्यांची वाचा दुरुस्तीचे कार्य केल्या जाते. वाचा दुरुस्तीसाठी लागणारे सर्व साहित्य या खोलीत उपलब्ध आहे
शिघ्रनिदान व हस्तक्षेपण केंद्र
संस्थेने विद्यालयात 0 ते ४ वर्षांतील बालकांचे शिघ्रनिदान हस्तक्षेपण केंद्र सुरु केले आहे. यामध्ये येणाऱ्या बालकाचे तज्ञांद्वारे तपासणी करुन त्यांना शासकिय योजनेचा लाभ याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. तसेच त्यांना त्यांच्या पालकासोबत आठवड्यातून कमीत कमी दोन दिवस उपस्थित राहून त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात येते. लवकरच वो.ए.ई. या आधुनिक यंत्राद्वारे लहान बालकांची तपासणी करण्याची सुविधा संस्था उपलब्ध करणार आहे. ज्यामुळे बालकांचे कर्णबधिरत्वाचे निदान होण्यास मदत होईल.
राउंड टेबल बैठक व्यवस्था
वर्गांत विशेष शिक्षक अध्यापन करतांना या राऊंड टेबल बैठक व्यवस्थेचा महत्वपूर्ण उपयोग होतो. या बैठक व्यवस्थेमधे शिक्षकाचा चेहरा व त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव व शिक्षकांच्या देहबोली याचे निरीक्षण विद्यार्थ्यांना करता येते. त्यामुळे शिक्षक शिकवत असलेला अभ्यासक्रम अध्यापन करतांना मुले पूर्ण क्षमतेने ग्रहण करतात व त्यास प्रतिसाद देतात राऊंड टेबलमुळे विद्यार्थ्याना सहज वर्गात वावर करता येतो
समुह श्रवण यंत्र (Group Hearing Set )
वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देतांना शिक्षकांचा संवाद, किंवा जो विषय ते शिकवतात तो विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्यासाठी समुह श्रवण यंत्राचा उपयोग होतो. समुह श्रवण यंत्र हे ८,१०,१२ विद्यार्थ्यांसाठी असतो. विद्यालयात आज रोजी ९ समुह श्रवणयंत्र संच उपलब्ध आहेत
इ लर्निंग शिक्षण विभाग
इ लर्निंग शिक्षण विभागामध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी पर्यंतचे सर्व विषयांचे शिक्षण दिल्या जाते. इ लर्निंगद्वारे विश्वाची माहिती चार भिंतीच्या आत देणे सहज शक्य आहे. सध्या विद्यालयात ३ इ लर्निंग संच उपलब्ध आहेत.
अद्यावत संगणक कक्ष
सध्याचे युग हे संगणकाचे युग आहे. ज्याला संगणकाचे ज्ञान आहे. त्यास साक्षर समजले जाते. कर्ण बधिर विद्यार्थी सुद्धा संगणकीय ज्ञानापासून वंचित राहू नये यासाठी संस्थेने अद्यावत संगणक कक्षाची उभारणी केली आहे. यामध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण दिल्या जाते. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना डी.टी.पी. चे प्रशिक्षण देऊन परीक्षेला बसविण्यात येते. आज पर्यंत सर्व डी.टी.पी. बॅचचा निकाल १०० टक्के लागला आहे
माध्यमिक शिक्षण
कर्णबधिरांसाठी इयत्ता ४ थी पर्यंत शिक्षण देणाऱ्या बऱ्याच शाळा आहेत. परंतु ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळा फार कमी आहेत. यावर पर्याय म्हणून संस्थेने २००३ – २००४ ते २००८ पर्यंत १७ नंबरचा फॉर्म भरुन विद्यार्थ्यांना १० वी बोर्डाच्या परीक्षेला बसविले व या बॅचचा निकाल १०० टक्के लागला.
त्यानंतर २०१० मध्ये वर्ग ८, ९, १० च्या वर्गांना विभागाची रितसर परवानगी मिळवून १० वी प्रथम बॅच सन २०१३ – १४ मध्ये एस.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेला प्रविष्ठ करण्यात आली. २०१३ – १४ पासुन आतापर्यंत १० वीचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला व आनंदही झाला.
कलादालन
संस्थेने विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच स्वतःच्या पायावर उभे राहता येईल असे शिक्षण देण्यासाठी भव्य कलादालनाची उभारणी केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना चित्रकला, हस्तकला, मुर्तिकला, तसेच राखी बनवणे, आकाश कंदिल बनवणे, बुके तयार करणे, ग्रिटिंग्ज, पेनस्टॅण्ड, फाईल, लिफाफे (वेस्ट पासुन बेस्ट), निरुपयोगी वस्तूपासून उपयोगी वस्तू तयार करणे इत्यादींचे प्रशिक्षण दिल्या जाते. यामुळे विद्यार्थ्याच्या कला गुणांना मूर्त आकार दिला जातो व रोजगार मिळावा या दृष्टीने प्रशिक्षण दिल्या जाते.
भोजन कक्ष
संस्थेने विद्यालयात एक वेळी १५० विद्यार्थी भोजन करु शकतील अशा प्रशस्त भोजन गृहाची व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांना सकाळी दुध, नाश्ता, सकाळचे जेवण व संध्याकाळचे जेवण देण्यात येते
स्वयंपाक विभाग
स्वयंपाक विभागात २५० विद्यार्थ्यांचा नाश्ता, भोजन तयार करण्याची व्यवस्था आहे. स्वयंपाक विभागात भोजन तयार करण्यासाठी गॅस, शेगड्या, सिलेंडर, पीठ मळणी यंत्र, पिठाची गिरणी, मिक्सर मोठे, फ्रिज, स्वयंपाक तयार करण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी लागणारी भांडी मुबलक प्रमाणात आहेत.
वसतीगृह विभाग
वसतीगृहात मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला पलंग स्वतंत्र गादी चादर (बेडशीट) वेगळी दिलेली आहे. मुलांचे टॅायलेट व बाथरुम त्या-त्या विभागाला स्वतंत्र आहे. मुलांना मनोरंजनासाठी टि.व्ही. डिव्हीडीची व्यवस्था आहे. तसेच कॅरम, बुद्धीबळ इत्यादी इनडोअर खेळण्याची सोय आहे. विद्यार्थ्यांना स्वतंत्र लॉकर सुविधा आहे
स्वातंत्र्य दिवस
१५ ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करत असतो. या दिवशी, विद्यार्थ्यांसह, तरुण पिढीला स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले जाते. विद्यार्थ्यांना आपल्या देशाचा समृद्ध इतिहास समजावा यासाठी शाळांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात
प्रजासत्ताक दिवस
२६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. आमाच्या शाळेत प्रजासत्ताक दिनानिमीत्ताने ध्व्जारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. प्रजासत्ताक दिनानिमीत्त शाळेमध्ये विविध सांसस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. त्यामध्ये देशभक्तिवर नाटक, नृत्य आणि भाषण होते. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात येते.
जागतिक दिव्यांग दिवस
3 डिसेंबर रोजी आमच्या शाळेत जागतिक ‘दिव्यांग दिन‘ म्हणून साजरा केला जातो. जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तींबाबत सर्वसामान्य जनतेत (समाजामध्ये) जनजागृती निर्माण व्हावी, दिव्यांग विद्यार्थ्यांचा सन्मान व्हावा, त्यांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी. या उद्देशाने दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो. तसेच समाजातील प्रत्येक घटकांनी दिव्यांगांच्या प्रति, सहानुभूती न दाखवता त्यांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे. जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तींच्या समस्या समजावून घेता याव्यात याबाबत समाजात जनजागृती व्हावी, दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन, त्यांच्या उध्दारासाठी मदत मिळावी, असा उद्देश्य असतो
महाराष्ट्र दिवस
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. दरवर्षी १ मे ला हा दिवस “महाराष्ट्र दिन” म्हणून आमच्या शाळेत साजरा केला जातो. १ मे हा दिवस “कामगार दिन” म्हणून सुध्दा ओळखला जातो. देशाच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेक लोकांनी अंदोलने करून आपल्या प्राणाचे बलिदान दिले. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.शाळा, महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी शाहिद हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले जाते. त्यांच्या कामा बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते. प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना पुरस्कृत केले जाते. मोठ्या उत्साहात प्रत्येक मराठी माणूस हा दिवस साजरा करतो
वर्धापन दिवस
२ ऑक्टोंबर १९८५ रोजी श्रीराम एज्युकेशन सोसायटी ची स्थापना झाली. म्हणून हा दिवस आमच्या संस्थेचा वर्धापन दिवस म्हणून साजरा केला जातो. २ ऑक्टोंबर १९८५ रोजी १५ विद्यार्थ्यांना घेऊन कर्णबधिरांच्या शिक्षणाचे रोपटे लावण्यात आले. त्याचे आज भव्य वटवृक्षात रुपांतर झाले. समाजातील ज्या मुलांना मुके बहिरे म्हणून वाळीत टाकले जात होते त्याच मुलांना समाजाच्या प्रवाहात प्रवाहित होण्याकरिता त्यांचे सामाजिक समायोजन व्हावे, बालके स्वालंबी व्हावित, स्वाभिमानाने जीवन जगावित या उद्देशाने त्यांचे अध्ययन, पुनर्वसन व रोजगार निर्मितीकरिता झटणारी विदर्भातील ही ख्यातनाम सेवाभावी संस्था, मायेची सावली ठरत आहे.
